2 Likes
कोनते ओषधी वापरावी.
संतोष जी पाणी देण्याची सोय आहे का?
एक दोन पाणी देण्याची सोय असेल तर जमिनीतून एकरी @२० किलो युरिया द्यावे.
व फवारणी मधून १९:१९:१९@७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच पिकाच्या वयानुसार 30 ते 35 दिवसांपर्यंत नत्र द्यावे पाणी उपलब्ध नसल्यास नत्राची मात्रा देऊ नये आणि खुरपणी करून घेऊन पाण्याचे बाष्पीभवन थांबवावे जेणेकरून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून घेण्याचा प्रयत्न करावा