करपा रोगाची लक्षणे त्याच बरोबर नागअळी, लीफ कर्ल आणि स्फुरदची कमतरता दिसत आहे.
अशी झाडे ५-१०% पर्यंत असेल तर रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
लक्षणे जास्त प्रमाणात असेल तर उपाययोजना करून देखील नियंत्रण मिळवणे कठीण वाटत आहे.
व्यवस्थापन
१) रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी
२) शेतात एकरी @४० निळे/पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
३) करपा/लीफ कर्ल रोगाच्या नियंत्रण करिता स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली ,
किंवा डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम + ब्लू कॉपर @ ३० ग्रॅम + अमिनो असिड@४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.