टोमॅटो पिकामध्ये फुलगळ होण्यासाठी बरीच कारणे कारणीभूत ठरत असतात जसे कि वातावरणातील बदल आणि पाण्याची पाळी देण्यात मागे पुढे होणे, रसशोषक किडी, बुरशीजन्य रोग, अन्नद्रव्ये कमतरता अशा अनेक कारणांमुळे फुलगळ होत असते. यासाठी पिकामध्ये अशी समस्या दिसून येताच पिकाचे निरीक्षण करावे व नेमके कारण काय आहे समजून घेऊन योग्य त्या कीटक/बुरशीनाशकांचा वापर करावा. बुरशीनाशकामध्ये antracol (प्रोपिनेब ७० %) @ ३०ग्रॅम @ तसेच पाण्याचे नियनमित नियोजन करावे व अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.