कृपया फोटो जवळून काढलेले अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन करावे.
फळ पोखरणारी अळी किंवा तुटा (नागअळी)चे लक्षणे असू शकतात.
कीड फळांवर गोल छिद्र करते. त्यामुळे संधी साधू बुरशीची वाढ झालेली वाटत आहे.
उपाययोजना
१) कीडग्रस्त फळे वेचून नष्ट करावी.
२) शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे उभी करावी.
३) किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी @१० कामगंध सापळे प्रस्थापित करावे.
४) किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल (५पतंग/ सापळा किंवा २ फळ/रोप) असे असल्यास खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
५) किडीच्या प्रभावीनियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.