Tamoto

टमाट्यावर करपा व नाग आळी आलेली आहे

1 Like

नागअळीचे लक्षणे आहेत. टोमॅटो पिकावरील हि प्रमुख कीड आहे.

ह्या किडीवर रासायनिक किडीचे प्रभावी नियंत्रण सध्या मिळत नाही.
सध्या कामगंध सापळा हे एकच प्रभावी साधन आहे.
नागअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी @१५-२० कामगंध सापळे प्रस्थापित करावे.
अळी नियंत्रण करिता सध्या इमामेम्क्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + करपासाठी नियंत्रण करिता अमिस्टार @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रत्येक फवारणीसोबत निंबोळी अर्काची फवारणी केल्यास नागअळीवर नियंत्रण मिळवता येते.