Soyabin perani kdhi karavi

mazya shetat soyabin kadhi peru

सोयाबीन पेरणीची सोप्या भाषेत माहिती.
ABP माझा 7/12

सोयबीन पेरणी सल्ला:
१) पावसाच्या पाण्यावर पेरणी करत असाल तर ७०- १०० मिमी पाऊस पडल्यास व पुरेशी जमिनीत ओल असल्यास पेरणी करावी.
२) सध्या विहिरी/बोरवेल/तळ्यातील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर अगोदर शेत पूर्णपणे ओलीत करून घ्यावे. सिंचन करताना जमिनीची ओल अर्ध्याफुट पर्यंत जाईल याची काळजी घ्यावी. पाणी व्यवस्थापन केल्यानतर जमिनीचे तापमन कमी होई पर्यंत वाट पहावी व नंतर एक दोन दिवसांनी वापसा अवस्था आल्यास पेरणी करता येईल.
बीबीएफ पद्धतीने पेरणी कशी करावी माहितीसाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडीओ शेवट पर्यंत बघा.
३) पेरणी करताना बीबीएफ (रुंद वरंबा सरी) या पद्धतीने केल्यास उत्पादनात १५-२०% वाढ होते.
४) पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. प्रथम ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२५ ग्रॅम/किलो व नंतर रायझोबीम @२५०ग्रॅम/१० किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी व बियाणे पेरणी करता वापरावे.

1 Like