चुरडा-मुरडा व्हायरसची लक्षणे दिसत आहेत व सोबत अन्नद्रव्ये ची कमतरता देखील दिसत आहे. रोगाचा प्रसार रसशोषक (फुलकिडे, लालकोळी) कीड मार्फत होतो.
व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) त्वरित मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी त्यामुळे चुरडा मुरडा रोगांचे प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन:
- त्वरित शेतात सूक्ष्म अन्नद्रव्ये @10 किलो + गांडूळ खत @150 किलो पिकांच्या भोवती द्यावेत.
- ठिबकद्वारे हयुमिक असिड @1 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.