कापाशी पिका वरती हि नवीन किड आली आहे यावर उपाय sanga

उपाय sanga

गोगलगाय आहे. संध्याकाळी किंवा रात्री कपाशीच्या झाडावर चढून पाने व फुले कुरतडते. कापूस पिकावर फारसा नुकसान होत नाही.

नियंत्रणाचे उपाय
१ ) शेतात ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावेत. त्यावर गोगलगायी आकर्षित होतात. सकाळी सूर्योदयानंतर पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करून नष्ट कराव्यात.
२) संध्याकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात. त्यानंतर जमिनीत खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.
३) गोगलगायींचे वास्तव्य मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत.
पालापाचोळा, तण काढून शेत नेहमी स्वच्छ ठेवावे.
४)लहान शंखी गोगलगायी मिठाची फवारणी किंवा कॅल्शिअम क्लोराइडचाही बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.
-मेटाल्डिहाइड ५ टक्के पावडरची पिकावर धुरळणी करावी.