Samadhan

सर मला कोथिंबीर ला बारा दिवस झाले आहेत तर पुढील नियोजन कसे करावे हे सांगा

3 Likes

कोथिंबीर मध्ये रोपे अवस्थेत मर रोगाचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोड्रामा व्हीरीडी @50 ग्रॅम/10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच चांगले कुजलेले शेणखत @१०० किलो/ १० गुंठे या प्रमाणात घेऊन ट्रायकोड्रामा जैविक बुरशी मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.

1 Like

सर मला कोथिंबीर साठी पहिली फवारणी करायची आहे तर कुठल्या कुठल्या प्रकारचे औषध वापरावे

कोथिंबीर ला पंधरा दिवस झाले आहेत पहिली फवारणी कुठल्या औषधाची करावी

एवढ्या लवकर फवारणीची आवश्यकता नाही. खत नियोजणात पाट पाण्याद्वारे १९:१९:१९ (पाण्यात विरघळनारे खत)@२ किलो/१० गुंठे क्षेत्रासाठी वापरावे.

1 Like

ठीक आहे सर

मग पहिली फवारणी कितव्या दिवशी करावे

आता रस शोषक कीड नियंत्रण करिता निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोबत वाढीसाठी अमिनो असिडची फवारणी करावी.