शक्यतो सड लागल्यास नियंत्रण करण्यास खूप कठीण जाते.
सड लागू नये म्हणून नियंत्रण अपाययोजना करणे खूप आवश्यक आहे.
आले पिकात सड दोन प्रकारे येतात एक म्हणजे बुरशीजन्य दुसरे म्हणजे जिवाणूजन्य.
सडलेले कंद दाबल्यास त्यातून जर द्रवरूप स्त्राव होत असेल व त्याचे उग्र वास येत असेल तर त्याला जिवाणूजन्य कंदकुज समजावे.
उपाययोजना:
बेडमध्ये पाणी साचून राहत असेल तर त्यापाण्याचा निचरा करावा. मुख्य सडीची सुरुवात तिथूनच सुरु होते.
१) बरेच आले उत्पादक शेतकरी अलीकडच्या काळात सड लागलेल्या ठिकाणची माती कंद्सहित गोळा करून प्लॉटच्या बाहेर फेकून देतात शक्य असल्यास ती उपयोजना करता येईल.
२)आले सडी साठी स्पॉट ड्रेंचींग करणे खूप आवश्यक आहे. कमीप्रमाणात सड असेल तर ट्रायकोडर्मा व्हिरीडी @२ किलो + सुडोमोनास @२ किलो +४ किलो गुळ /२०० लिटर पाण्यात मिसळून एक दिवसासाठी भिजत घालावे. दुसऱ्यादिवशी सकाळी भिजत घातलेले द्रावण @१००-१५० मिली द्रावण सड लागलेल्या ठिकाणी स्पॉट ड्रेंचींग करावी. उर्वरित द्रावण ठिबकच्या सहायाने शेतात सोडून द्यावे.
३) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% WP @१०० ग्रॅम + कासुबी @५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून @१००-१५० मिली द्रावण सड लागलेल्या ठिकाणी स्पॉट ड्रेंचींग करावी.
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कंद माशी किड उघडे पडलेल्या कंदात आपली अंडी घालतात कालांतराने ती अंडी उबवून कंदावर आपली उपजीविका करतात त्यामुळे कंद सडची लक्षणे दिसतात.
उपाययोजना
**कंद माशीवरील नियंत्रणाचे उपाय **
१)उघडे पडलेले कंदाला मातीच्या सहायाने भर द्यावी.
२) कंद माशी नियत्रण करिता एरंडीचे बिया भरडून @ १ किलो + २ लिटर पाणी एकत्र मिसळून एका टोपल्यात ठेवून शेतात ठीक ठिकाणी ठेवावे. असे तयार केलेले द्रावण ४-५ ठिकाणी ठेवावे.
३) कंद माशी नियंत्रण करिता डायमेथोएट ३०% ec (रोगर) @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.