कांदा पिकांवर जांभळा करपा व पीळ पडणे ( ट्वीस्टर) ब्लाईट रोगाची लक्षणे आढळतात. सोबत फुलकिडे रसशोषक किडीची लक्षणे दिसतात.
करपा रोगाच्या नियंत्रणकरिता कब्रियो टॉप (Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG)१० ग्रॅम किंवा बोनस (tebuconazole 38.9% SC)@१० मिली + फिप्रोनील ५% @४० मिली + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर कांदा रोपांची लागवड करून ५०-६०- दिवसाचे झाले असल्यास व त्या मध्ये मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास त्वरित १०:२६:२६ @१५ किलो + सोबत दाणेदार किंवा पावडर स्वरूपाचे बुरशीनाशक जसे कि रेडोमिल गोल्ड @१२५ ग्रॅम किंवा ताकत (कॅप्टन ७०+ हेक्झाकोनझोल ५% पावडर)@१२५ ग्रॅम/१० गुंठे क्षेत्रासाठी या प्रमाणात घेऊन शेतात सिम्पून द्यावे.
गरज पडल्यास पुन्हा फवारणीचे नियोजन करावी.
फवारणीमध्ये अधून मधून सूक्ष्म अन्नद्व्य्रे मिसळून फवारणी केल्यास दुहेरी फायदा होतो.
सड असलेल्या ठिकाणी ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो + कुजलेले शेणखत @१०० किलो एकत्रित करून मातीत मिसळून द्यावे.