Pane gola hot aahe

pane gola hot asun ful and fal dharna kami hot aahe

1 Like

चुरडा - मुरडा रोगाची लक्षणे आहेत.
कोकडा (लीफ कर्ल ) रोगाची लक्षणे आहे.
या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो.
फुलकिडीवर मागील काही महिन्यापासून कोणत्याही किटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्याचे कारण असे कि आपण कीड नियंत्रण करताना केवळ रासायनिक कीड नियंत्रणावर जास्त निर्भर राहत आलेलो आहे. कोणत्याही पिकात एकात्मिक नियोजन केल्यास कीड नियंत्रण मिळवणे सोपे होते.

एकात्मिक उपाययोजना

अ) लागवडी दरम्यान करावयाच्या उपायोजना
१) नर्सरीतून रोपे आणल्यास निम तेल/करंज तेल @५ मिली/लिटर पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करावी.
२) रोपे लागवड करताना वरील शेंडा खुडणी करून लागवड करावी.
३) मिरची शक्य असल्यास मल्चिंग पेपर वापर करूनच करावी त्यामुळे रस-शोषक किडीचा उपद्र्व्य कमी करण्यास मदत होते.
४) रोपे लागवडीपूर्वी जमीनीत निंबोळी पेंढ @१०० किलो + कुजलेले शेणखत @५०० किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.
५)

ब) लागवडीनंतर उपाययोजना
१) लागवडीनंतर ८ दिवसानी ठिबकद्वारे मेटाऱ्हायझीयम अनिसोपिली @१ लिटर + बेवेरिया बसियाना @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे/आळवनीद्वारे करावी.
२) वरील नियोजन केल्यानतर रोगर @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) शेतात ठिकठिकाणी एकरी @२० निळे/पांढरे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
४) पहिली फवारणी करताना वर्टीसेलियम लेकॅनी @१०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) रोगग्रस्त (कोकडा) झाडे काढून त्वरित नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडांवर रोगांचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
६) लागवडीनंतर १५ दिवसांनी सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७) ब्रोफ्लानिलाइड ३००% एससी (एक्सपोनस) @३ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खत व्यवस्थापन
१) सध्या कीड नियंत्रण करिता दिलेल्याप्रमाणे नियोजन करावे.
२) जीवामृत/अमृत पाणी देण्याची सोय करावी.
३) ठिबकद्वारे १३:४०:१३ @५ किलो + ह्युमिक असिड @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी द्यावे.
४) फवारणीद्वारे टाटा बहार @ ४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.