पेरु (पिकामध्ये पेरू हे option नसल्यामुळे डाळिंब निवडले आहे.)

पेरूच्या झाडाच्या खोडाला कीड लागल्याचे आढळून आले नेमकी कोणत्या प्रकारची कीड आहे व पेरू या फळांमध्ये कीड निर्माण होत आहे त्यामुळे फळाचे मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे त्यासाठी कोणते औषध फवारणी खोडावर करता येईल का?

1 Like

पेरू चे फळ फळमाशी ने खराब होत आहे
पडलेले फळे वेचून त्याचे योग्य रीतीने विल्हेवाट लावावे,बाजारात फळमाशी ट्रॅप भेटतात @१ ट्रॅप/झाड लावावे.
खोड कीड साठी dichlorovhos ७६%ec १० मिली एका कापसाच्या बोळात भिजवून छिद्रात तारीच्या मदतीने आत टाकावे व छिद्र चिखलाने किंवा चिकट टेप ने बंद करावी.