Mar rog

डाळींब बागा मर रोग बरा होण्यासाठी उपाय सांगा .तसेच डाळींब झाड पिवळे होऊन मरते.

मररोगाची लक्षणे:
सर्वप्रथम बागेची नियमित काळजीपूर्वक पाहणी करावी. एखादे झाडे अथवा झाडांची फांदी पिवळी पडली असल्यास किंवा वाळून गेली असल्यास अन्नद्र्व्येची कमतरतेची लक्षणे पानांवर दिसत असल्यास अशा निवडक झाडांचे सखोल परीक्षण करावे. सर्वप्रथम अशा झाडाचे ठिबक तपासून पाहावे. बऱ्याचदा अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे झाडे पिवळी पडून सुकतात. त्याचबरोबर अशा झाडांच्या मुळांवर आतून अथवा बाहेरील बाजूवर कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून घ्यावी. फांदी किंवा खोडामधील आतीलबाजू काळपट तपकिरी किंवा काळ्यारंगाची दिसल्यास मर रोगाची लागण झालेली आहे असे समजावे.

उपयोजना:

  1. मर रोगास प्रतिबंधक म्हणून दर ६ महिन्याने ट्रायकोड्रामा , सुडोमोनास किंवा मायकोरायझा @१ किलो/एकर २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.
  2. पहिली आळवणी: प्रोपिकोनाझोल २५ ईसी @२० मिली + क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  3. दुसरी आळवणी: अस्पेर्जीलस नायजर @५ ग्रम/झाड + २ किलो शेणखत याची करावी.

डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर