अदरक ला सड़ लागलेली आहे।। आनी तपकिरी karpa jast prananat aahe Kahi उपाय सांगा
आले पिकातील कंद कुज व्यवस्थापन**
कंद सडची दोन कारणे असू शकतात.
एक म्हणजे बुरशी (पायथियम अफॅनिडरमॅटम) मार्फत आणि दुसरी म्हणजे कंद माशी
ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कंद माशी किड उघडे पडलेल्या कंदात आपली अंडी घालतात कालांतराने ती अंडी उबवून कंदावर आपली उपजीविका करतात त्यामुळे कंद सडची लक्षणे दिसतात.
उपाययोजना
**कंद माशीवरील नियंत्रणाचे उपाय **
१)उघडे पडलेले कंदाला मातीच्या सहायाने भर द्यावी.
२) कंद माशी नियत्रण करिता एरंडीचे बिया भरडून @ १ किलो + २ लिटर पाणी एकत्र मिसळून एका टोपल्यात ठेवून शेतात ठीक ठिकाणी ठेवावे. असे तयार केलेले द्रावण ४-५ ठिकाणी ठेवावे.
३) कंद माशी नियंत्रण करिता डायमेथोएट ३०% ec (रोगर) @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कंदसड बुरशी वरील उपाय
१) ट्रायकोड्रामा व्हीरीडी + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ठिबक द्वारे आवळणी करावी.
२) जर प्लॉट मध्ये ठीक ठिकाणी कंद सडची लक्षणे असेल तर मेटालॅक्सिल ५% +मॅन्कोझेब ६४% @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून स्पॉट ड्रेचिंग करावी.
सर जैविक madhe वेस्ट डी कंपोजर chalte का, सड़ sati
अजुन चांगल्या क्वालिटी ची जैविक हुमिक औषधि सांगा स्पेशल adrk पिक sati
सड किती प्रमाणात आहे ? फोटो अपलोड करा.