Kid

vairas varti kinare ashad marave

रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करून बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.रोगग्रस्त झाडे कोणत्याही उपायाने निरोगी होऊ शकत नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा, या विषाणूचा कायमचा स्रोत झाडांवर टिकून राहतो, यामुळे एकाच वेळी इतर झाडांवर या रोगाचा मावा किडी द्वारे प्रसार होत राहतो.
पपई बागे मध्ये एक किंवा दोन झाडे असतील तर मावा किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीम लेकानी @10 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसाच्या अंतराने करावी.
जर रोगाची तीव्रता जास्त असेल तर इमिडक्लोप्राईड 17.8%@10 मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.