Kanda var zalela rogavar upchar sanga

कांदा वर झाल्याला रोगावर उपाय सांगा तसेच खताचे पण नियोजन सागावे.

1 Like

)* कांदा खत व्यवस्थापन ******

कांदा पिकासाठी हेक्टरी १०० :५० :५० (नत्र, स्पुरद व पालश ) शिफारश केलेली आहे.

एकरी (४० :२०:२०)

पेरणी /पुनर्लागवडी दरम्यान एकरी (२० :२०:२० ,नत्र, स्पुरद व पालश ) म्हणजेच ५० किलो DAP, ४० किलो MOP आणि ४० किलो युरिया पेरणी दरम्यान द्यावे.

उर्वरित २० किलो नत्र म्हणजे ४० किलो युरिया ३० व ४५ दिवसांनी विभागून द्यावे.

रब्बी कांदा पुनर्लागवडी पूर्वी गंधक एकरी@ १५ ते २० किलो या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

२)** कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पीळ पडणे ( ट्वीस्टर) ब्लाईट रोगाची लक्षणे आहेत. सोबत फुलकिडे रसशोषक किडीची लक्षणे दिसत आहे.

करपा रोगाच्या नियंत्रणकरिता कब्रियो टॉप (Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG)१० ग्रॅम किंवा बोनस (ebuconazole 38.9% SC)@१० मिली + फिप्रोनील ५% @४० मिली + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like