Harbara suku rahila

sar ,ha kay prakar aahe
harbara perun 10 divas zale.

तुमचा फोटो प्राप्त झालेला नाही. तुमच्या प्रश्नावरून हरभरा पिकात मर रोगाची लक्षणे दिसत आहे.

या वर्षी पाऊस जास्त झाल्याने जमिनीत जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास किंवा वापसा न आल्यास हरभरा पिकात मर रोग व कॉलर रॉट (मूळ कुज) रोगाची लक्षणे दिसू शकतात.

हरभरा पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.