गहू पीक पिवळे पडण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. योग्य व्यवस्थापनासाठी कारण ओळखणे महत्त्वाचे आहे. खाली थोडक्यात कारणे व उपाय दिले आहेत ![]()
गहू पिक पिवळे पडण्याची प्रमुख कारणे
- नत्र ( Nitrogen) अन्नद्रव्याची कमतरता
- पाणी साचणे किंवा पाण्याचा ताण
- थंडीचा ताण / धुके
- मुळांची वाढ कमी होणे
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता (झिंक , गंधक)
व्यवस्थापन उपाय
रासायनिक उपाय
- नत्र कमतरता असल्यास युरिया 25–30 किलो/एकर पहिल्या पाण्याबरोबर द्यावा.
- झिंक कमतरतेसाठी झिंक सल्फेट 10 किलो/एकर मातीमधून किंवा
0.5% झिंक सल्फेट + 0.25% चुना फवारणी करावी.
सेंद्रिय उपाय
- जीवामृत 200 लि./एकर पाण्यासोबत द्यावे.
- अमृतपाणी / घन जीवामृत मातीमध्ये टाकावे.
- दशपर्णी अर्क 5% किंवा फिश अमिनो अॅसिड 2–3 मि.ली./लि. फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
पिकांना गरजेनुसार पाणी द्यावी.
