गोगलगाय व्यवस्थापन:
- शेताचे बांध स्वच्छ ठेवावे.
2)संध्याकाळी आणी सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच झाडावर लपलेल्या गोगलगाय हाताने जमा करून साबणाच्या द्रावणात बुडव्यात व जमिनीत खड्यात पुरून टाकाव्यात.
3)गोगलगाय अंडी मातीमध्ये खोडा शेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली 100 ते 200 च्या पुंजक्याने घातलेली असतात.
ती पांढरट, पिवळसर रंगाची साबुदाण्याची आकाराची असतात ती गोळा करून नष्ट करावी. - जमिनीत ओल असताना भाताचे किंवा गवताचे कांडाचे तुकडे ,गुळ व ईस्ट आणि मिथोमिल यांच्या मिसळत्या द्रवणात भिजवून बांधाच्या शेजारी चार इंच पट्टा पद्धतीने टाकावे.
- मेटाडिहाईड गव्हाचा कोंडा, गूळ , पाणी यांचे आमिष शेतात ठीक ठिकाणी पानावर ठेवल्यास शंखी तिकडे आकर्षित होतात आणि अमिश खाऊन मरतात.
- मेटाडेक्स 5 % पावडरची झाडावर धुरळणी केल्याने शंखीचे नियंत्रंन होते.
सचिन Adhe