Aal

aal pik kevha lagavad karaychi aani kashi plz sanga

अर्जून जी आले पिकला कमीत कमी ९ महिन्यांचा कालावधी लागतो.
महाराष्ट्रात आले पिकाची लागवड मे महिन्यात शेवटचा आठवडा किंवा जून महिन्याचा पहिला पंधरवडा या कालावधीत केले जाते.
ज्या शेतात आले लागवड करायची असेल त्या शेताची नांगरणी मार्च - एप्रिल महिन्यात करावी.जमीन तयार करण्यासाठी २-३ कुळव्यच्या पाळी घालावी. मागील पिकाचे अवशेष वेचून नष्ट करावी.
नंतर बेड बनवून शिफारशीत खताची मात्रा जमिनीत मिश्रण करून द्यावे.